तळवेलसह ओझरखेड्यात सट्टा व गावठी दारूवर छापा : दोघांविरोधात गुन्हा
Raid on Satta and Village Liquor in Talvel and Ozarkhedi: Crime against both वरणगाव : तळवेल गावात मराठी शाळेजवळ पांडुरंग सखाराम महाले हा त्याच्या घराचे आडोशाला गावठी हातभट्टीची दारु कब्जात बाळगून विक्री करताना आढळल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले तर दोन हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली.
दरम्यान, ओझरखेडा गावात बसस्थानक परिसरात एका टपरीच्या आडोश्याला प्रदीप प्रल्हाद मोंढाळे हा लोकांकडून कल्याण मटका नावाच्या सट्टा जुगारावर सट्याचे आकडे व पैसे स्वीकारत असताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. सट्टा जुगाराची साधने व रोख पाचशे रुपये जप्त करण्यात आले. संशयीतांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे व वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत ठाकूर, ईश्वर तायडे, भूषण माळी, प्रमोद कंखरे आदींनी ही कारवाई केली.

