कोथळीत भरदिवसा धाडसी घरफोडी : 38 हजारांची रोकड लांबविली


Daring house burglary in broad daylight in Kothali : 38 thousand cash was extended मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे भरदिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी 38 हजारांची रोकड लांबवली. ही घटना 29 मार्च रोजी रात्री 8 वाजता उघडकीला आली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दिवसा घरफोडीने खळबळ
प्रवीण श्रीराम जंगले (40, रा.कोथळी, ता.मुक्ताईनगर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. 29 मार्च रोजी दुपारी दोन ते रात्री दरम्यान घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून 38 हजारांची रोकड लांबविली. जंगले हे रात्री घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार समोर आला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक संदीप वानखेडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !