सांगवी ते हिंगोणा रस्त्यावर अॅक्टीवा आगीत खाक
Active fire on Sangvi to Hingona road यावल : यावल ते फैजपूर मार्गावरील सांगवी ते हिंगोणा दरम्यान पेट्रोल पंपाजवळ बंद पडलेल्या अॅक्टीवा दुचाकीने अचानक पेट घेतला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. दुचाकी चालक महिलेने स्वत:हाचा बचाव करीत दुचाकीपासून लांब गेल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली.
काही क्षणात दुचाकीने पेटली
यावल तालुक्यातील फैजपूर येथील रहिवाशी मनिषा संजय महाजन (40) या आपल्या ताब्यातील अॅक्टिवा दुचाकी (क्रमांक एम.एच. 19-3249) ने सोमवार, 1 एप्रिल रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास यावलकडून फैजपूर येथे जात असतांना सांगवी व हिंगोणा गावाजवळच्या असलेल्या सांगवी पेट्रोल पंपाजवळच्या परिसरात रस्त्यावर दुचाकी ही अचानक बंद पडून जाम झाली. त्यानंतर दुचाकीला बाजूला थांबवून रस्त्याच्या कडेला लावली असता पाहणी करीत असताना दुचाकीने अचानक पेट घेतला. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली. यावेळी जवळच असलेल्या रसवंती चालकाच्या मदतीने आग विझवण्यात आली मात्र तोपर्यंत खाक झाली तर सुदैवाने महिलेने सतर्कता दाखवल्याने त्या बचावल्या.

