भारताची मान जगात उंचावणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर जनतेचा विश्वास ; चाळीसगावात पुन्हा कमळ फुलणार : मंत्री गिरीश महाजन

दलबदलू नेत्यांचे घराणेशाही पुढे लोटांगण चाळीसगावकरांना पटलेले नाही : आमदार मंगेश चव्हाण


People’s trust in Prime Minister Narendra Modi who raised the dignity of India in the world; Lotus will bloom again in Chalisgaon: Minister Girish Mahajan चाळीसगाव : पक्ष संघटनेत काम करत असताना अनेकांना संध्या द्याव्या लागतात तर अनेकदा थांबावे लागते. कामाचे मूल्यमापन करून पक्ष नवीन संधी व जबाबदार्‍या देत असतो. हरिभाऊ जावळे, ए.टी.नाना, स्मिताताई वाघ यांच्यासारखी अनेक उदाहरणे आपल्या जिल्ह्यातील देता येतील, त्यांना पुढे पक्षाने दुसर्‍या जबाबदार्‍या दिल्या मात्र एक संधी नाकारताच पक्ष सोडून जाने म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची व आपल्याला मत देणार्‍या जनतेची फसवणूक करणे आहे त्यामुळे येणार्‍या काही दिवसातच त्यांना त्यांची जागा कळेल. लोकांचा विश्वास मोदिजींवर आहे, त्यांनी केलेल्या विकासकामांवर आहे, त्यांच्या विकसीत भारताच्या संकल्पावर आहे. गेल्या 10 वर्षात रेल्वे, हायवे, सिंचन सुविधा यात झालेला आमुलाग्र बदल जनते समोर आहे तसेच जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासून भाजपा व मोदिजींवर प्रेम करणारा असल्याने येथील सर्व स्तरावरील मतदार हा येणार्‍या लोकसभा निवडणुकीत अबकी बार 400 पार चा नार सार्थ ठरवतील, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. ते चाळीसगाव येथे भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई-रासप-रयत क्रांती महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलत होते.

हजारो कार्यकर्ते उपस्थित
भर दुपारच्या वेळी घेण्यात आलेल्या या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते. जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या एकत्रित असा हा पहिलाच मेळावा चाळीसगाव येथे यशस्वी झाल्याने सर्वत्र उत्साह दिसत होता.


यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासह माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे, रिपाइं जळगाव लोकसभा प्रमुख आंनद खरात, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष नितीन पाटील, महायुतीचे घटकपक्ष शिवसेना तालुकाध्यक्ष राहुल पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांच्यासह महायुतीचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुथप्रमुखाला वाहिली श्रद्धांजली
दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे यांचे वडील सुरेश साळुंखे तसेच आडगाव येथील बुथप्रमुख राजाराम हिरे यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यांनी केले मार्गदर्शन
नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्यासह आमदार मंगेश चव्हाण, स्मिता वाघ, एम.के.अण्णा पाटील, साहेबराव घोडे, ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, पवनराजे सोनवणे, संजय पवार, अमोल शिंदे, आनंद खरात, जेष्ठ नेते सुरेश सोनवणे, सुनील निकम, संजय पाटील, राजेंद्र राठोड, भावेश कोठावदे आदी महायुतीच्या नेत्यांनी आपल्या जोरदार भाषणांच्या माध्यमातून उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केल.

चाळीसगावातून एका लाखांचा लीड मिळवून देणार : आमदार चव्हाण
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ही निवडणूक गल्लीची नाही तर दिल्लीची सत्ता कुणाच्या हातात असावी याची असल्याने जनता कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी व अबकी बार 400 पार हा आकडा पार करण्यासाठी नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई वाघ या विक्रमी मताधिक्याने लोकसभेत जातील, त्यात योगदान म्हणून चाळीसगाव तालुक्यातून आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्मिताताई यांना एक लाखांचे मताधिक्य मिळवून देऊ असा निर्धार यावेळी व्यक्त केला.

चाळीसगाव हा तर भाजपाचा बालेकिल्ला
चाळीसगाव हा तालुका भाजपचा बालेकिल्ला आहे. या तालुक्याने अनेक नेतृत्व जिल्ह्याला, राज्याला दिले, पक्षात अनेक चढउतार आले तरी त्यांनी पक्ष सोडला नाही मात्र ज्यांना अवघ्या 10 वर्षात आमदारकी-खासदारकी मिळाली, जे 8 दिवसांपूर्वी पक्षाला आई म्हणत होते त्यांनी पक्षाने एक संधी नाकारताच आई सारख्या पक्षाशी बेईमानी केली. असे व्यक्ती कोणत्याही विचारधारेशी किंवा पक्षाशी एकनिष्ठ नसतात, उलट समाजासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी घातक असतात

अशा प्रवृत्तींना गाडण्याची गरज
जे बेलगंगा कारखाना विकणार्‍यांच्या घरापुढे बेशरमाचे झाड लावणार होते, आज ते स्वार्थासाठी बेशरमासारखे त्यांच्याच घरी गेले. ज्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रस्थापित घराणेशाही विरोधात संघर्ष उभा केला. केसेस अंगावर घेतल्या, रात्रीचा दिवस एक केला त्याच घराणेशाहीच्या दारी यांनी लोटांगण घातले हे जनतेला अजिबात आवडलेलं नाही. त्यांना या वृत्तीचा किळस आलेला आहे. त्यामुळे अश्या प्रवृत्तीला गाडण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे.

नार-पार नदीजोडच्या माध्यमातून फसवणूक
गिरणा बलून बंधारे, नार पार नदीजोडच्या नावाने दिशाभूल केली जात आहे, गुजरातला जाणारे पाणी अडवू नये म्हणून तिकीट कापले असा जावई शोध काही मंडळीना तिकीट कापल्यानंतर लागला. मात्र ज्या उद्धव ठाकरेंच्या पक्षात हे गेले त्यांनी महाविकास आघाडी असताना 24 महिन्यात साधी बलून बंधार्‍याना पर्यावरण मान्यता दिली नाही, मग याचं खरच गिरणा माय वर प्रेम आहे का ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. गिरणा बलून बंधार्‍याना पहिली प्रशासकीय मान्यता गिरीशभाऊ जलसंपदा मंत्री असताना 28 डिसेंबर 2018 रोजी देण्यात आली. 70 वर्षात नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाचे साधे अंदाजपत्रक सुद्धा कुठल्या सरकारने केले नव्हत ते अंदाजपत्रक तयार करण्यासाठी 6 एप्रिल 2018 म्हणजे बरोबर आजच्या 6 वर्षांपूर्वी तो ऐतिहासिक शासन निर्णय घेतला.

वरखेडे धरणाला केंद्राच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत गिरीशभाऊमुळे समावेश झाला, 500 कोटी निधी मिळून 5 वर्षात काम पूर्ण झाल. मात्र जे याच मी केल मी केल म्हणून श्रेय घेतात त्यांना 5 वर्षात साधा तामसवाडी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवता आला नाही, नाहीतर आज गिरणेवर पाणी अडले असते.

ही सर्व सिंचनाची प्रकल्प केवळ केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीनेच होऊ शकतात त्यामुळे जळगाव जिल्ह्यालाच नव्हे तर खान्देशाला सिंचन सुब्बत्ता आणण्यासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बहुमताने निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी कुठेही गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने व एकनिष्ठपणे 13 मे मतदानाच्या दिवसापर्यंत झोकून देऊन काम करण्याचे आवाहन यावेळी आमदार चव्हाण यांनी केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !