भुसावळातील नगरसेविका गुंजाळ यांनी चमकोगिरीसाठी काढले पत्रक : भाजपा गटनेता युवराज लोणारींचा दावा


भुसावळ (12 जुलै 2026) : भाजपाच्या प्रभारीराजमध्ये 16 रोजी होणार्‍या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक 14 मधील विकासकामे घेण्यात आली नसल्याचा दावा या प्रभागातील नगरसेविका सुभद्रा गुंजाळ यांनी केला होता मात्र हा दावा तथ्यहीन असल्याचा दावा भाजपाचे गटनेता युवराज लोणारी यांनी केला आहे. केवळ चमकोगिरीसाठी नगरसेविकांनी पत्रक काढल्याचे लोणारी यांनी सांगत त्यांनी अजेंडा व्यवस्थित वाचण्याचा सल्ला दिला आहे. या प्रभागातील कामांचे आठ विषय अजेंड्यावर घेण्यात आल्याचे लोणारी म्हणाले आहेत.

अहंकार बाजूला ठेवून करावी चर्चा
युवराज लोणारी म्हणाले की, नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे यांनी संपूर्ण शहराची कामे अजेंडवर घेतली आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. काही कामे सुटली असल्यास ती कामे पुढच्या वेळी घेता येतील. मुळातच प्रभाग क्रमांक 14 च्या सुभद्रा गुंजाळ यांचे आरोप तथ्यहीन असून त्यांनी प्रसिद्धीसाठी चालवलेला हा प्रयत्न केला. त्यांनी मिटींगचा अजेंडा वाचलेला दिसत नाही कारण त्यांच्या प्रभागातील आठ कामे अजेंड्यावर आहेत. त्यांचे नेते वा त्यांचा गट भाजपा नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे यांना नगराध्यक्षा म्हणून मानत नाहीत शिवाय ‘त्या’ पाट्या लावून फिरतात, असे आरोप ते करतात मात्र त्याच नगराध्यक्षांकडून दुसरीकडे कामाची अपेक्षा केली जाते.

प्रभागातील कामे करायची असल्यास आपला स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून नगराध्यक्षांची चर्चा केली पाहिजे, असा सल्ला लोणारी यांनी दिला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !