भुसावळात एसआयआर अभियानाला वेग : मंत्री संजय सावकारे यांचा चारही विभागांत मॅरेथॉन संवाद

बुथ प्रमुखांच्या अडचणींचे जागेवरच निवारण ः कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, मतदार नोंदणी मोहिमेला नवी गती


भुसावळ (रविवार, 12 जुलै 2026) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला गती देण्यासाठी राज्याचे मंत्री तथा भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांनी शनिवारी मतदारसंघातील चारही विभागांमध्ये मॅरेथॉन चर्चासत्रे घेतली. या बैठकीत बुथ प्रमुख, माजी नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी थेट संवाद साधत मतदार नोंदणी प्रक्रियेत येणार्‍या अडचणींचा आढावा घेण्यात आला.

अनेक प्रश्नांवर तत्काळ निघाला मार्ग
चर्चासत्रांदरम्यान कार्यकर्त्यांनी मांडलेल्या तांत्रिक, प्रशासकीय आणि स्थानिक स्वरूपाच्या विविध समस्यांची मंत्री सावकारे यांनी सविस्तर माहिती घेतली. संबंधित अधिकार्‍यांशी समन्वय साधून अनेक प्रश्नांवर तत्काळ मार्ग काढण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. भुसावळ उत्तर विभागाचा मेळावा लोणारी हॉल येथे, दक्षिण विभागाचा मेळावा माळी हॉल येथे, ग्रामीण पूर्व विभागाचा मेळावा बोरोले मळा येथे, तर ग्रामीण पश्चिम विभागाचा मेळावा कुर्‍हा येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरात पार पडला.

‘वन-टू-वन’ संवादातून समस्यांवर उपाय
बैठकीदरम्यान मंत्री सावकारे यांनी प्रत्येक विभागातील बुथप्रमुख व पदाधिकार्‍यांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. मतदार नोंदणीसाठी फॉर्म भरताना तसेच विविध प्रशासकीय प्रक्रियेदरम्यान येणार्‍या अडचणी कार्यकर्त्यांनी मांडल्या. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देत आवश्यक ते समन्वय साधण्यात आला. त्यामुळे आगामी मतदार नोंदणी मोहिमेसाठी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.

मतदार नोंदणी मोहिमेला नवी ऊर्जा
चर्चासत्रांनंतर बूथ प्रमुख व पदाधिकार्‍यांमध्ये एसआयआर अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रत्येक पात्र मतदाराची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी बुथ स्तरावर अधिक सक्रियपणे काम करण्याचे नियोजन करण्यात आले.

बुथ सक्षमीकरणावर भर
मतदारसंघातील प्रत्येक बूथ मजबूत करण्यावर भर देत मतदार नोंदणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्री सावकारे यांनी दिल्या. बूथस्तरावरील नियोजन, कार्यकर्त्यांचे समन्वय आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन यामुळे अभियानाला अधिक वेग मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी बूथ लेव्हल अधिकारी, बुथ प्रमुख, माजी नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रदेश, जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !