मतदान केंद्र परिसरात उष्माघात कक्षासह हवी सावलीची व्यवस्था

भुसावळातील सामाजिक कार्यकर्ता शिशिर जावळे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी


Shading arrangement is required along with thermal room in the polling station area भुसावळ : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा 19 एप्रिल ते 20 मे 2024 पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुका होत असून उन्हाळ्यात राज्यातील सर्वाधिक उष्णता व तापमानाची नोंद असणारे एकमेव शहर म्हणून भुसावळची ख्याती आहे. या अनुषंगाने मतदान केंद्रावर उष्माघात कक्षासह सावलीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता शिशिर जावळे यांनी केली आहे.

तर मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता
ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक आल्यामुळे मतदारांना घराबाहेर एव्हढ्या तीव्र तापमानामध्ये मतदानासाठी निघताना दमछाक होणार आहे. मतदारांना उन्हाचा फटका बसण्याची दाट शक्यता असल्याने महाराष्ट्रातील भुसावळसह रावेर लोकसभा मतदारसंघ तसेच इतर सर्व लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर उष्माघात कक्ष, थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच मतदान केंद्र परिसरामध्ये टेन्टची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जावळे यांनी केली आहे. उष्णतेच्यापासून बचाव करण्यासाठी मतदारांना ही व्यवस्था करून देणे अत्यंत आवश्यक आहे तसेच वाढते तापमान लक्षात घेऊन मतदानाची वेळ ही सकाळी 6.30 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढवून मिळावी, अशी अपेक्षा ही व्यक्त करण्यात आली आहे. एकीकडे करोडो रुपये खर्च करुन शासन मतदार जागृती अभियानाच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र उष्माघातापासून बचावासाठी मतदान केंद्रावर व्यवस्था उपलब्ध न झाल्यास लोकसभा निवडणूकित मतदार मतदानासाठी एवढ्या अतिशय तीव्र तापमानामध्ये घराबाहेर निघणार नाहीत त्यामुळे याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो आणि मतदानाचा टक्का कमी होऊ शकतो, अशी भीतीदेखील व्यक्त करण्यात आली.


केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवले पत्र
महाराष्ट्रामध्ये भुसावळ शहरासह रावेर लोकसभा मतदार संघ व इतर सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर त्वरित मतदारांच्या उष्माघातापासून रक्षण करण्यासाठी व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी वरील विविध उपाययोजना सूचनांची त्वरित दखल घ्यावी व योग्य कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !