भुसावळातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपीला अटक
Rape of minor girl in Bhusawal : Accused arrested भुसावळ : शहरातील एका भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा नराधम आरोपीने विनयभंग करीत तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला मात्र पीडीतेने सतर्कता दाखवत आरोपीच्या तावडीतून पळ काढला. याप्रकरणी आरोपी महेश ज्ञानेश्वर तायडे (भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. घटना घडल्यानंतर आरोपीला जमावाने चांगलेच तुडवत पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे समजते.
आरोपीला अटक
14 वर्षीय पीडीतेने याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. गुरुवार, 11 रोजी सायंकाळी साडेचार वाजतेच्या सुमारास आरोपीने पीडीतेला घरात नेत पाणी देण्याच्या बहाण्याने विनयभंग केला मात्र पीडीतेने सतर्कता दाखवत घरातून पळ काढत कुटूंबियांना माहिती दिली. यावेळी जमावाने आरोपीला चांगलेच चोपून काढले. गुरुवारी रात्री उशिरा आरोपीविरोधात पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहेत.

