आमोदा-भुसावळ रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार


Bike rider killed in accident on Amoda-Bhusawal road यावल : यावल तालुक्यातील आमोदा-भुसावळ रस्त्यावर पायी चालणार्‍या तरुणाला दुचाकी चालकाने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वाराच्या डोक्याला दुखापत होऊन तो जागीच ठार झाला होता. हा अपघात रविवार, 7 एप्रिल रोजी घडला होता. अपघाताला व स्वतःच्या मरणाला कारणीभूत ठरणार्‍या मयत दुचाकीस्वाराविरोधात फैजपूर पोलिसात शुक्रवारी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मयत दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
आमोदा-भुसावळ रस्त्यावर अशोक हेमा पाटील यांच्या शेतासमोर प्रकाश रामा बारेला (35, रा.बोरपाल, ता.चैनपूर, जि.खरगोन, मध्यप्रदेश) हा दुचाकी (क्रमांक एम.पी.10 झेड.ए.1958) घेऊन जात असताना पादचारी सद्दाम रऊफ तडवी (24, रा.बेघर वस्ती, आमोदा) यांना धडक बसली व अपघातात दुचाकीस्वार प्रकाश बारेला यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सद्दाम तडवी यांच्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार प्रकाश बारेला याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !