नांदुरा तालुक्यात खासदार रक्षा खडसेंनी लावली लग्नांमध्ये हजेरी

नांदुरा तालुक्यातील अनेक गावात प्रचार दौरा : भाजपाला मतदानाचे केले आवाहन


नांदुरा :  रावेर लोकसभेतील महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी बुधवारी नांदुरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भेटी दिल्या. यावेळी खासदारांनी अनेक ठिकाणी आयोजित विवाह सोहळ्यांना धावती हजेरी देत वधू-वरांना आशीर्वाद दिले तसेच देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील उत्सवात उपस्थितांना मतदानाचे आवाहन केले.

सकाळी या भागात केला दौरा
नांदुरा तालुक्यातील मौजे तांदुलवाडी, शेंबा, टाकरखेड, बेलुरा खैरा, महाळुंगी, माळेगाव गोंड आदी भागात प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेत त्यांच्याशी हितगुज साधले. यावेळी नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.


दुपारनंतर या गावांमध्ये दिल्या भेटी
रावेर लोकसभा महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी बुधवारी दुपारनंतर नांदुरा तालुक्यातील मौजे वडनेर भोलजी, चांदुरबिस्वा, मामुलवाडी, अलमपुर, निमगाव, हिंगणे गव्हाळ, येरळी आदी गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकार्‍यांसोबत प्रचार दौरा केला. यावेळी मतदारांशी खासदारांनी हितगुज करीत त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती
खासदार खडसे यांच्यासोबत माजी आमदार चैनसुख संचेती, शिवाभाऊ तायडे व नांदुरा तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी उपस्थित होते. नांदुरा तालुक्यातील मौजे वडनेर भोलजी, चांदुरबिस्वा, मामुलवाडी, अलमपुर, निमगाव, हिंगणे गव्हाळ, येरळी आदी गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला व भाजपाला मतदानाचे आवाहन करण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !