भुसावळात कारच्या धडकेने दुचाकीस्वार विवाहिता जखमी
A married woman on a two-wheeler was injured after being hit by a car in Bhusawal भुसावळ : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने 45 वर्षीय विवाहिता जखमी झाली. याप्रकरणी कार चालकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्वाती प्रवीण भोळे (45, सरवेश्वर नगर, संतोषी माता हॉलजवळ, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, 30 रोजी दुपारी दिड वाजता त्या दुचाकी (एम.एच.19 सी.डी.2000) ने घरी जात असताना जुना सातारा भागातील कुंभारवाड्याजवळ पांढर्या रंगाची भरधाव स्वीप्ट कार (एम.एच.20 डी.एफ.0722) वरील चालकाने धडक दिल्याने विवाहिता जखमी झाल्या तर दुचाकीचे नुकसान झाले. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक जाकिर मन्सुरी करीत आहेत.

