पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसर्यांदा निवडून देण्यासाठी भाजपाला मतदान करा
मलकापूरात खासदार रक्षाताई खडसे यांचे आवाहन
मलकापूर : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसर्यांदा निवडून देण्यासाठी भाजपाला मतदान करा, असे आवाहन रावेर लोकसभेतील भाजपा उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी केले. मलकापूरातील फेरो ऑईलटेक प्रा.लि., एम.आय.डी.सी. येथे विजय संकल्प मेळावा शुक्रवारी झाला.
डी लिंटर मशीनचे उद्घाटन
यावेळी उपस्थित पदाधिकार्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी तसेच महायुती उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. खासदार म्हणाल्या की, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदानसाठी प्रयत्न करण्यात यावेत. यावेळी फेरो ऑईलटेक प्रा.लि., येथील नवीन टेक्नोलॉजी युक्त डी-लिंटर मशीनचे रक्षाताई खडसे यांच्याहस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी खासदारांसह माजी आमदार चैनसुख संचेती, शिवचंद्र तायडे, रामनिवास चंदुलाल बोहरा, मोहनजी शर्मा, डी.एस.चव्हाण, तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वाघोदे आदींची उपस्थिती होती.





