राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा वाघोदा गावाजवळ अपघात
Accident of vehicles belonging to Sharad Pawar’s convoy of Nationalist Congress Party near Waghoda village यावल : चोपडा येथील प्रचार सभा आटोपून भुसावळकडे येत असतांना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या ताफ्यातीन दोन वाहनांचा अपघात झाला. ही घटना शुक्रवार, 3 मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले तर एक कार्यकर्त्यास किरकोळ दुखापत झाली.
अपघातात कार्यकर्ता जखमी
रावेर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी चोपडा येथे सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेसाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे उपस्थित होते. दुपारी सभा आटोपल्यानंतर शरद पवार यांचा ताफा भुसावळकडे रवाना झाला. यावेळी यावल तालुक्यातील वाघोद्याजवळ पवार यांच्या मागे आलेल्या (एम.एच.15 सी.एम. 9276) आणि (एम.एच. 48 एस. 5895) हे दोन वाहन आपसात धडकले. समोर गतीरोधक आल्याने पुढील वाहन धारकांने अचानक ब्रेक दाबला म्हणून दुर्घटना घडली यात सुदैवाने कुणालाही मोठी गंभीर दुखापत झाली नाही तर एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला. वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
