शुभ बोल रे नार्‍या ! : कोकणात उद्धव ठाकरे कडाडले


Say good bye, Narya! : Uddhav Thackeray is tough in Konkan कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची कोकणात सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर सडकून टिका केली. ते म्हणाले की, एक म्हण अशी आहे की, शुभ बोल रे नार्‍या. मी येणार म्हटल्यानंतर कसे येतात बघतो म्हणालास, मी तर येऊन उभा आहे. तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, अरे तुला लाज वाटली पाहिजे. दोन-तीन वेळेस तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला. माझ्या घरात तिकडे उभारला तिकडे साफ करुन टाकला. लाज नाही लज्जा नाही. फक्त बडबडतो का?, असा एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना धुतले.

ठाकरे म्हणाले हे तर बेअकली?
उद्धव ठाकरे म्हणाले, चार दिवसांपूर्वी येऊन गेलो होतो. म्हटलं आता काय बोलायचं, पण आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे नेते पचकून गेले. बेअकली जनता पार्टी आहे. शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली नाहीतर दुसरे काय असणार? आजपर्यंत त्यांना मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो. काही लाज वाटत नाही. कमळाबाई म्हणत होतो आणि आता बेअकली म्हणतो.


उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नावर बोला. कोंबडीचोर बरोबर घेतलाय तरी अंडी काही बाहेर येत नाहीयेत, त्यावर बोला. तुमच्या पेक्षा कोंबडं बरं. राम मंदिर बांधलं हे चांगलंच केलं. पण तुमची हिंमत नव्हती, तेव्हा शिवसेना पुढे होती. हिंदूह्रदय सम्राट म्हणा नाहीतर तुमची जीभ सरळ करता येते. मी राम मंदिरात जाऊन आलो. तुम्ही भवानी मातेच्या मंदिरात का गेला नाहीत? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !