गोंडगाव हरिनामाच्या गजराने गाव दुमदुमले : माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली पायी दिंडी


भडगाव (शुक्रवार, 24 जुलै 2026) : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून गावातून भक्तिमय पायी दिंडी काढली. विणा, टाळ, मृदुंगाच्या गजरात तसेच मुखी हरिनाम आणि हाती भगवे झेंडे घेऊन विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा सुंदर अनुभव साकारला.

दिंडीत विद्यार्थ्यांनी पांढरे कपडे, धोतर, टोपी व रुमाल तर विद्यार्थिनींनी रंगीबेरंगी साड्या परिधान करून आकर्षक वारकरी वेशभूषा केली होती. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या दिंडीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. पांडुरंगाच्या भक्तिगीतांनी गाव दुमदुमून गेले.

विद्यार्थ्यांच्या वारकरी वेशभूषेने आणि शिस्तबद्ध सहभागाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या पायी दिंडीचे पालक व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले.

या उपक्रमासाठी क्रीडा शिक्षक एस.डी.चौधरी आणि पी.व्ही.सोळंके यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी.ननावरे यांच्यासह शिक्षक सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, आर. एस. देवकर, व्ही. ए. पाटील, एस. आर. पाटील, पी. व्ही. सोळंके, बी. डी. बोरसे, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, ए. एम. साळुंखे, लिपिक पी. जे. देशमुख, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !