हिंगोण्याील 76 सभासदांना कर्जमाफीचा मिळाला लाभ


यावल : महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करण्यासाठी नुकतीच महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना सुरू केली असून या कर्जमुक्ती योजनेची सुरुवात हिंगोणा येथील विविध कार्यकारी सोसायटीमार्फत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संस्थेने 112 सभासदांचे प्रमाणीकरण पूर्ण करून घेतलेल आहे. त्यापैकी शासनाने 76 सभासदांच्या खात्यांमध्ये 54.87 लाख कर्ज खाती वर्ग करून सभासदांचे खाते निरंक करण्यात केले आहेत. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये हिंगोणा विकासोची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र शासन आय.टी.विभाग मुंबई यांच्या पथकाने नुकतीच भेट दिली व काही शेतकरी कर्ज माफीपासुन वंचित राहिल्याने त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या तसेच त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन आय.टी.विभागाचे अधिकारी गणेश मोरे यांनी विकासो सचिव यांना राहिलेल्या कर्ज माफीदारांबात पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या होत्या. यावेळी सहा. निबंधक विजय गवळी, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, विकासो चेअरमन, व्हा.चेअरमन संतोष सावळे, के.पी.पाटील, एम.पी.भारंबे, पी.डी.पाटील, विनोद देशमुख, क्षेत्रीय अधिकारी पी.एन.राणे, ए.टी.तायडे, सी.के.महाजन, विजयसिंह पाटील, राजेंद्र महाजन, ललित महाजन, सुभाष गाजरे, शेतकरी तुकाराम लोंढे, दिलीप वायकोळे, प्रभाकर बोंडे, संजय चौधरी, नामदार तडवी आदी उपस्थित होते. दरम्यान, सोसायटीचे व्हा.चेअरमन संतोष सावळे म्हणाले की, शेतकर्‍यांना या योजनेचा शंभर टक्के लाभ होणार असून सोसायटीचे आधार प्रमाणीकरणचे काम युध्दपातळीवर सुरू आहे तसेच या कर्ज माफीत सोसायटीला नफा होणार आहे. सचिव विजयसिंह पाटील म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले ही कर्ज माफी योजना मी शेतकर्‍यांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !