भुसावळात उधारीच्या वादातून चालकावर प्राणघातक हल्ला : सात संशयीतांविरोधात गुन्हा


Assault on driver over loan dispute in Bhusawal : Case against seven suspects भुसावळ : दिलेल्या पैशांपैकी उर्वरीत पाच हजारांची रक्कम मागितल्याच्या रागातून 35 वर्षीय चालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना जलाल शहा बाबा दर्ग्याजवळ शनिवार, 4 मे रोजी रात्री 12.30 वाजता घडली. याप्रकरणी गुरुवार, 9 मे रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सात संशयीतांविरोधात गुन्हा
इमरान शेख गुलाम रसुल (35, रा.जलाल शहाबाबा दर्गा, भुसावळ) हा तरुण व्यवसायाने चालक असून आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. इमरान शेख याने सोमेश सोनवणे याला उसनवारीने 40 दिले होते व या पैशांपैकी उर्वरित पाच हजार रुपये इमराने शेखने शनिवारी मागितल्यानंतर मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास संशयीतांनी शिविगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत पाहून घेवू, अशी धमकी दिली तसेच डोक्यात लोखंडी पाईप मारून दुखापत करण्यात आली. ही घटना जलाल शहा बाबा दर्ग्याजवळ शनिवार, 4 मे रोजी रात्री 12.30 वाजता घडली.

याप्रकरणी सोमेश सोनवणे, किशन पचेरवाल, संतोष सोनवणे, कुणाल सोनवणे, प्रताप सुरवाडे, निलेश पारधे, जितू कैलास करोशिया (सर्व रा.भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे हे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !