यावल शहरात अक्षय तृतीयानिमित्ताने ओढल्या बारागाड्या
Chariots drawn on the occasion of Akshaya Tritiya in Yaval city यावल : यावल शहरातील फैजपूर रस्त्यालगत विस्तारीत भागातील बहिरम बुवा व बसस्थानक आवारातील काळ भैरव महाराज यांची यात्रा शुक्रवारी उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त फैजपूर रस्त्यावरून थेट बुरूज चौकापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या.
नागरिकांची बारागाड्या पाहण्यासाठी गर्दी
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यावल येथे काळभैरव महाराज व बहिरम बुवा यांचा यात्रा शुक्रवारी पार पडली. या निमित्ताने सायंकाळी फैजपूर रस्त्यावरील मनुदेवी मंदिरापासून बारागाड्या ओढण्यात आल्या. भगत किशोर दगडू बारी बगले प्रवीण सुरेश भालेराव व निलेश बाबू पारधे यांनी बारागाड्या ओढल्या. पांडुरंग सराफ नगराजवळील मनुदेवी मंदिरापासून तर बुरुज चौकापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या. यावलसह परिसरातील नागरिकांनी बारागाड्या पाहण्यासाठी गर्दी केली होती.


भगत व भाविक बारीवाड्यापासून वाजत-गाजत मुख्य रस्त्याने काळभैरव मंदिरात आले. तिथून दर्शन घेऊन पांडुरंग सराफ नगरातील बहिरम बुवा मंदिराजवळ दर्शनासाठी भगत गेले व नंतर पाच प्रदक्षिणा बारा गाड्यांना केल्यावर बारागाड्या ओढल्या जातात. संध्याकाळी सर्व शहरातील भाविकांनी व नागरिकांनी बारागाड्या ओढल्या. या गाड्यांवर मोठ्या संख्येत भाविक-भक्त बसले होते. हा संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला. बारागाड्यांच्या कार्यक्रमात यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.