भुसावळात पुन्हा भरदिवसा घरफोडी : 24 हजारांचा ऐवज लंपास
भुसावळ : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र थांबायला तयार नाही. जामनेर रोड परिसरातील गायत्री शक्तीपीठाजवळील पुरूषोत्तम नगरातील चैतन्य अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी प्लॅट बंद असल्याची संधी साधत 24 हजारांची घरफोडी केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
सुजाता श्रीकांत मंत्री (55) या खाजगी नोकरदार आहेत. शुक्रवार, 3 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी दोन दरम्यान चोरट्यांनी प्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत गोदरेज कपाटाचे लॉक तोडून 15 हजारांचे चांदीचे देव, समई, घंटी, पायल आदी साहित्यासह आठ हजारांची रोकड चोरून नेली. मंत्री या घरी आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना सूचित केले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पघडन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार यासीन सत्तार पिंजारी करीत आहेत.
