चिनावल येथे अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने शेतकर्‍याचा मृत्यू


A farmer died after being run over by a tractor in Chinawal सावदा : येथून जवळच असलेल्या चिनावल येथे रविवार, 12 मे रोजी शेतकरी यशवंत हेमचंद्र धांडे (57) यांचा ट्रॅक्टर व रोटाव्हेटर शेतात दुरुस्त करताना त्यात अडकून व गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला.

शेतात आंतर मशागतीसाठी ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडणी करताना यशवंत धांडे यांच्या अंगावर ट्रॅक्टर गेल्याने त्यांना तत्काळ दवाखान्यात हलवण्यात आले मात्र गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. या दुर्दैवी घटनेमुळे चिनावल व परिसरात शोककळा पसरली आहे. मयत शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !