यावलला दुचाकी घसरल्याने माजी सैनिक जखमी
यावल : यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरील मनुदेवी मंदिरासमोर रविवारी दुपारी दुचाकी घसरून माजी सैनिक जखमी झाला. अपघातानंतर नागरीकांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
यावल रुग्णालयात प्रथमोपचार
यावल शहरात फैजपूर रस्त्यावरील मनुदेवी मंदिरासमोरून रविवारी दुपारी दुचाकी (क्रमांक एम.एच.14 ए.क्यू. 8901) व्दारे माजी सैनिक अविनाश पाटील (रा.म्हसावद, ता.रावेर) हे यावल शहरात येत असताना त्यांची दुचाकी घसरली व ते रस्त्यावर कोसळले. घटनास्थळावरून बबलु गजरे, देवानंद सोनवणे यांनी जखमी माजी सैनिक पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात आणले. अधिपरिचारीका नेेपाली भोळे, विजय शिंदे, शेख रऊफ यांनी प्रथमोपचार केले. पाटील यांच्या डोक्याला व उजव्या पायाला दुखापत झाली आहे.
