निंभोरा शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने अमळनेरच्या प्रौढाचा मृत्यू


भुसावळ : अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने रस्ता ओलांडणार्‍या अमळनेरच्या 56 वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात निंभोरा बु.॥ शिवारातील हायवे क्रमांक 53 वरील निंभोरा गावाजवळील हायवेजवळ घडला. याप्रकरणी अज्ञात वाहनधारकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक फौजदार श्यामकुमार आत्माराम मोरे यांच्या फिर्यादीनुसार, दिनेश बाबूराव तेलंग (56, मूळ रा.अमळनेर) हे 6 मे रोजी साडेआठ वाजेच्या सुमारास निंभोरा बु.॥ शिवारातील महामार्ग ओलांडत असताना अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !