चिनावलमध्ये दगडफेकीनंतर तणाव : पोलीस स्थानकासमोर ग्रामस्थांचा ठिय्या : 20 मे पर्यंत संचारबंदी
Tension after stone pelting in Chinawal : Villagers sit in front of police station : Curfew till May 20 सावदा : येथून जवळच असलेल्या चिनावल येथे किरकोळ कारणावरून सुरू असलेल्या भांडणानंतर जोरदार दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तणावग्रस्त करण्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. सावदा पोलिसांनी धाव घेत वातावरण निवळले. याप्रकरणी रात्री उशिरा चार संशयीतांसह इतर जमावाविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, गावातील तणाची स्थिती पाहता 20 मे पर्यंत गावात संचारबंदी जारी करण्यात आली आहे.
किरकोळ वाद उफाळला
चिनावल येथे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास महादेव वाड्याजवळ किरकोळ कारणातून वाद झाले. याप्रसंगी वानगल्ली, महादेव वाडा आणि महाजन वाडा या गल्ल्यांमध्ये काही समाजकंटनांनी जोरदार दगडफेक केली. यातच कुणी तरी डीपीला दगड मारल्याने अंधार पसरल्याने या गोंधळात भर पडली.

गावात 20 मे पर्यंत संचारबंदी
दरम्यान, यानंतर चिनावल गावातील शेकडो स्त्री-पुरूषांनी पोलीस चौकीच्या समोर ठिय्या मांडून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. परिस्थिती पाहता तत्काळ चिनावल येथे दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. पोलीस अधीक महेश्वर रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी चिनावल येथे भेट देऊन स्थिती जाणून घेतली. या संदर्भात सावदा पोलीस स्थानकात रात्री उशिरा चार संशयीतांसह अन्य अनोळखींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. रात्री उशीरा उपविभागीय अधिकारी देवयानी यादव यांनी चिनावल येथे 20 तारखेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जारी केले.