मुक्ताईनगर तालुक्यातील विवाहितेवर फोटो व्हायरलची धमकी देत अत्याचार


मुक्ताईनगर : फोटो एडिट करून समाजमाध्यमात व्हायरल करण्याची धमकी देत 21 वर्षीय विवाहित तरुणीवर अत्याचार करण्यात आला. मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. आसीफ मुश्ताक खाटीक असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील 21 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या नणंदेला संशयीत आसीफ मुश्ताक खाटीक याने बहिण मानल्याने त्याचे घरात येणे-जाणे होते व या ओळखीचा गैरफायदा घेऊन संशयीताने विवाहितेचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क वाढविला. यानंतर त्याने काही फोटो काढले. हे फोटो एडिट करून सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. 17 एप्रिल व 28 एप्रिल रोजी विवाहितेवर बळजबरी करीत शारीरीक अत्याचार केले. यानंतर संशयीताने पुन्हा धमक्या दिल्या व 3 मे 2024 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आसीफ खाटीक हा या महिलेच्या घरी येऊन बळजबरी करू लागला.

याप्रसंगी विवाहितेचे कुटुंबिय जागी झाल्याने तो पळून गेला. पीडीतेच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन सर्व माहिती जाणून घेतली. यानंतर आसीफ मुश्ताक खाटीक याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !