रेल्वेतून पडून अनोळखीचा मृत्यू : ओळख पटविण्याचे आवाहन
रावेर : रावेर-वाघोड रेल्वे स्टेशनदरम्यान धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या अनोळखी पुरुषाची ओळख पटविण्याचे आवाहन रावेर पोलिसांनी केले आहे. या घटनेबाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रावेर वाघोड रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वेगाडीतून 28 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजेपूर्वी अप मेन लाईनवर खंबा 47903 च्या जवळ पुलाखाली रेल्वेतून पडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला.
मयत अनोळखी पुरुषाचे अंदाजे 60 ते 65 वर्ष असून मृतदेह कुजलेला आहे. अंगात निळ्या रंगाचे टी शर्ट व टी शर्टच्या मागील बाजूस इंग्रजीत एसएफ सोनिक लिहिलेले, पायात पांढर्या रंगाची पँट व पायात पांढर्या रंगाची सॅण्डल घातलेली आहे. अशा वर्णानांची व्यक्तीबद्दल माहिती असल्यास त्यांनी रावेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.
