भुसावळात जीमला शॉर्ट सर्कीटने आग : पाच लाखांचे नुकसान


Gym fire in Bhusawal due to short circuit: loss of five lakhs भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या साई प्लाझा इमारतीमधील एमएच फिटनेस या जीमला शनिवार, 18 सकाळी 5.30 वाजता शॉर्ट सर्किटने आग लागली. यावेळी जीमसाठी आलेल्या युवकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. पालिकेच्या अग्निशमन केंद्राच्या गाडीने 30 मिनिटात आग विझविली.

शहरातील जामनेर रोडवरील साई प्लाझा या इमारतीत असलेल्या एमएच फिटनेस या जीममध्ये शनिवारी सकाळी युवक जीम करीत असतांनाच तेथे शॉटसर्किट झाले. यामुळे जीममध्ये एकच धावपळ झाली. तेथे जीम करण्यासाठी आलेल्या युवकांनी तत्काळ आग विझविण्यासाठी धावपळ सुरू केली. आगीची माहिती पालिकेच्या अग्निशमन केद्राला मिळताच तेथे तात्काळ बंद दाखल झाला. बंबावरील कर्मचार्‍यांनी सुध्दा पाण्याचा माारा करून आग विझवली. सकाळीच जीममध्ये शॉट सर्किटमुळे आग लागल्याने परिसरातील नागरिकांनी धावपळ केली. आगीत जीममधील महागडे साहित्य जळून खाक झाले, असे जीमचे ट्रेनर व मालक हर्षल चौधरी, मयुर कुरकुरे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !