चुंचाळे तपोभूमीत आज गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा

शेकडो वर्षांची परंपरा : दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


Guru-disciple death anniversary ceremony today in Chunchale Tapobhoomi यावल : यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ वासुदेव बाबा कर्मभूमीत सोमवार, 20 मे रोजी गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेव बाबा यांचा एकाच तिथीवर एकाच तारीख वैशाख शुद्ध बारसला गुरु व शिष्य यांचा पुण्यतिथी सोहळा चुंचाळेतील श्री समर्थ वासुदेवबाबा दरबारात होत आहे.

चुंचाळे हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी असून आहे. 125 वर्षांपूर्वी श्री समर्थ सुकनाथ बाबांनी 12 वर्षे तप केल्याने चुंचाळे, ता.यावल ही त्यांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते.



गुरू-शिष्य परंपरेचा सोहळा
श्री समर्थ रघुनाथ बाबा हे श्री समर्थ सुकनाथ बाबा यांचे पूत्र, शिष्य असून चुंचाळे हे त्यांचे जन्मस्थळ आहे. सुकनाथ बाबांचा नात सांप्रदायाच्या गादीचा वारसा त्यांनी चुंचाळे येथे पुढे सुरू ठेवला. सन 1935 मध्ये फाल्गुन शुद्ध पाडवा श्री समर्थ सुकनाथ बाबा व 1979 वैशाख शुद्ध बारसला श्री समर्थ रघुनाथ बाबा समाधीस्थ झाले. दोघा पिता-पुत्रांची समाधी वर्डी, ता.चोपडा येथे आहे.
श्री समर्थ वासुदेव बाबा हे श्री रघुनाथबाबा यांच्याजवळ वर्डी तालुका चोपडा येथे राहत असत. श्री समर्थ रघुनाथ बाबांनी श्री समर्थ वासुदेव बाबांना वरणगाव जवळचे फुलगाव येथे हनुमान मंदिरात गुरुमंत्र दिला होता. श्री समर्थ रघुनाथ बाबा 1979 मध्ये चोपडा येथे समाधीस्थ झाल्यावर त्यांनी त्यांचे शिष्य श्री वासुदेव बाबा यांना चुंचाळे, ता.यावल येथे जाऊन नाथ संप्रदायाची पताका उंच कर व जनसामान्याच्या संपर्कात राहून त्यांचे कामे कर असा आदेश श्री रघुनाथ बाबांनी दिला. त्यावेळेस श्री समर्थ वासुदेव बाबा हे चुंचाळे, ता.यावल येथे आले. त्यांनी सर्वात पहिले काम म्हणजे गावामध्ये दोन गटांतील धर्माची भिंत पाडली व ती तेढ मिटवली व सर्वांना एकत्र करून गावाचा तसेच मंदिराचा विकास केला.

अंधश्रद्धेला कधीही खतपाणी नाही
श्री समर्थ वासुदेव बाबा हे बालब्रह्मचारी होते. सर्व भक्तच हा त्यांचा मला मोठा परिवार आहे. त्यांनी कधीही जादू टोंना, छु-छा, धागा दोरा केला नाही.

जुन्या मठाचे भल्यामोठ्या दरबारात रूपांतर
श्री समर्थ वासुदेवबाबा चुंचाळे येण्याच्या आधी गावात एक पुरातन मठ होता त्या ठिकाणी एक फक्त जुनी समाधी होती, बांधकाम मात्र कोणतेही नव्हत. श्री समर्थ वासुदेवबाबांनी गावकर्‍यांच्या, परिसराच्या व श्री सुकनाथ बाबा, श्री रघुनाथ बाबा व त्यांच्या सर्व भक्तांच्या मदतीने गावात भलेमोठे मंदिराचे निर्माण केले. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशात त्यांचे शिष्य मोठ्या प्रमाणात आहे.

गावात शिक्षणाची सोय नसल्याने उभारले विद्यामंदिर
चुंचाळे गावात पहिली ते चौथीपर्यंत जि.प.ची मराठी शाळा होती. पुढील शिक्षणाची सोय नसल्याने मुले व मुली शिक्षणापासून वंचित राहत असत. पुढील शिक्षणासाठी मुली बाहेरगावी पाठवण्यास पालक वर्ग नाराज राहत असत त्यामुळे लोकांच्या आग्रहास्तव श्री समर्थ वासुदेवबाबांनी पाचवी ते बारावीपर्यंत विद्यामंदिर गावात उभारले आहे. आज या ठिकाणी गावातील तसेच परिसरातील मुले, मुली शिक्षण घेतात.

आगळावेगळा दुर्मीळ गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा
गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा हे वैशाख बारसला 1979 मध्ये समाधीस्थ झाले. त्यांच्या गुरुची पुण्यतिथी श्री वासुदेव बाबा चुंचाळे येथील मंदिरात आंब्याचा रस व पुरणपोळी प्रसाद देऊन साजरे करत असत. श्री समर्थ वासुदेवबाबा गावातील भक्तांना सांगायचे की मी ज्यावेळेस नसेल त्यावेळेस माझ्या गुरुची पुण्यतिथी (श्री समर्थ रघुनाथबाबा) अशीच तुम्ही साजरी करत चला. शिष्यमंडळ म्हणायचं की जसे तुम्ही तुमच्या गुरुची पुण्यतिथी साजरी करतात, तशी आम्ही आमचे गुरु म्हणजे (श्री समर्थ वासुदेवबाबा) तुमची पुण्यतिथी साजरी करत जाऊ. यावर श्री समर्थ वासुदेवबाबा हसत म्हणायचे काही हरकत नाही, माझी पुण्यतिथी आणि व माझ्या गुरुची पुण्यतिथी एकच राहील. याचाच प्रत्यय म्हणून श्री समर्थ वासुदेवबाबा यांनी सन 2000 साली श्री समर्थ रघुनाथबाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध बारसला श्री समर्थ वासुदेव बाबांनी आपल्या देहाचा त्याग केला. त्यांचे समाधी स्थळ चुंचाळे, ता.यावल या ठिकाणी आहे म्हणूनच सण 2001 सालापासून गुरु श्री समर्थ रघुनाथबाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेवबाबा असा दुर्मीळ योग असलेला गुरु आणि शिष्य यांचा पुण्यतिथी सोहळा वैशाख शुद्ध बारसला अर्थात 20 मे रोजी चुंचाळे येथे सालाबादाप्रमाणे साजरा होतो. विशेष म्हणजे श्री समर्थ वासुदेव बाबा यांचे मंदिर शिरपूर, जि.धुळे, विखरण, ता.एरंडोल येथे भक्तांनी प्रशस्त असे बनवले आहे.

असे आहे कार्यक्रमाचे स्वरूप
सहाटे सहा ते सात आरती, साते ते दहा भजने व भारुडे, 11 वाजता महाआरती, 12 ते पाच महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. लाभ घ्यावा असे आवाहन श्री सुकनाथ बाबा, श्री रघुनाथ बाबा, श्री वासुदेवबाबा यांचे शिष्य मंडळ व चुंचाळे-बोराळे तसेच परिसरातील गावकर्‍यांनी केले आहे. रात्रभर गावातील महिला जागरण करून या खापरावरच्या पुरणपोळ्या तयार करतात. यामध्ये पूर्ण गाव जसे काही आपल्या घरचाच कार्यक्रम असल्याने मानून आनंदाने राबतात. तरुण, आबालवृद्ध, पुरुष व महिला अत्यंत उत्साहाने हा सोहळा पार पाडतात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !