बारावी परीक्षेत मुलीच टॉपर : महाराष्ट्राचा निकाल 93.37 टक्के
Girls topper in 12th exam : Maharashtra result 93.37 percent मुंबई : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल मंगळवार, 21 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागल्याचे बोर्डाने कळवले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 5 जूनपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुभा असेल. यंदा मागील वर्षी पेक्षा 2.12 टक्के वाढ झाली आहे.
राज्यातील नऊ विभागीय मंडळातील निकाल
पुणे- 94.44%
नागपूर- 92.12%
छत्रपती संभाजीनगर- 94.08%
मुंबई- 91.95%
कोल्हापूर- 94.24%
अमरावती- 93.00%
नाशिक- 94.71%
लातूर- 92.36%
कोकण- 97.51%

यंदादेखील मुलीच ठरल्या अव्वल
14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली तर 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनी बाजी मारली. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 91.60 अशी आहे तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 95.44 अशी आहे. कोकणात सगळ्यात जास्त 97.91 टके निकाल तर मुंबईत सगळ्यात कमी 91.95 टक्के निकाल लागल्याचे समोर येत आहे.
6581 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7032 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6983 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6581 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 94.20 आहे. तर नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
34,988 खाजगी विद्यार्थी उत्तीर्ण
खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 41,362 एवढी असून त्यापैकी 40,794 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 34,988 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी 85.76 आहे.




