मसाका ऊस उत्पादकांना मोठा दिलासा : एफआरपीची प्रलंबित रक्कम बँकेत वर्ग होण्यास सुरुवात


फैजपूर : मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे गाळप हंगाम 2018 -2019 मधील थकीत ऊस पेमेंट एफआरपी रुपये 15.81 कोटी प्रलंबित होते. साखर विक्रीच्या उच्च न्यायालय, छत्रपती संभाजी नगर येथे जमा असलेल्या रकमे संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने प्रादेशिक सहसंचालक साखर (छत्रपती संभाजी नगर) यांना दिले होते.

प्रादेशिक सहसंचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार कारखाना व्यवस्थापनाने 1921.68 प्रति मेट्रीक टन प्रमाणे थकीत असलेली व दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव या बँकेत खाते असणार्‍या ऊस उत्पादक शेतकर्‍यांची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास मंगळवारी सुरूवात केली. उर्वरित इतर बँकांमध्ये खाते असलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांची तसेच रुपये 321.68 प्रति मेट्रीक टनाप्रमाणे प्रलंबित असलेली रक्कम टप्प्याटप्प्याने वर्ग करण्यात येईल अशी माहिती कारखाना व्यवस्थापनातर्फे प्राधिकृत अधिकारी व्ही.एम.गवळी व कार्यकारी संचालक रत्नदीप वायकोळे यांनी दिली. याबाबत माजी चेअरमन शरद महाजन यांनी न्याय प्रविष्ट रक्कम काही शेतकर्‍यांचे बँक खात्यात वर्ग होत असून न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !