नाशिकचे पाच जण भावली धरणात बुडाले
Five people from Nashik drowned in Bhavli Dam ईगतपुरी : ईगतपुरीजवळील भावली धरणात बुडाल्यानेन नाशिक रोड भागातील पाच जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने दोन महिला, दोन मुले पाण्यात न उतरल्याने बचावली.
यांचा झाला मृत्यू
मृतांमध्ये अनस खान दिलदार खान (17 , नाझिया इम्रान खान (15) , मिसबाह दिलदार खान (16), हनीफ अहमद शेख (24), इकरा दिलदार खान (14) यांचा समावेश आहे तर चौघे शालेय विद्यार्थी होते. मिसबाह कोठारी कन्या शाळेत दहावीला शिकत होती तर नाझियाही त्याच शाळेत आठवीत होती. अनस इयत्ता 8 वीत होता. तो व इकरा हे दोघेही मालधक्का रोडवरील उर्दू स्कूलमध्ये शिक्षण घेत होते.

आई, बहीण आणि दोन भाचे वाचले
या मुलांची आई हमीना शेख आणि बहीण काजल शेख आणि इतर दोन लहान मुले बचावली आहेत. या दोन मुलांची नावे समजू शकली नाहीत. काजल यांच्या लहान मुलीचा या दुर्घटनेत मृत्यू झाला
एकाच वेळी पाच जण बुडाले
नाशिक रोड भागातील नऊ जण रिक्षा (एम.एच. 15 जे.ए.2961) घेऊन भावली धरणावर मंगळवारी दोन वाजेच्या सुमारास पोहोचले. काठावर आंघोळ केल्यानंतर दोन तरुण आणखी पुढे गेले. तेथे पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ते पाहून सोबतच्या तरुणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने सर्वजण बुडाले.