दीपनगरचे दोन्ही संच कार्यान्वित : 900 मेगावॅट विजेचा राज्याला पुरवठा


भुसावळ : राज्यातून वीज मागणी वाढत असताना दीपनगर केंद्रातील 500 मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक चार बॉयरल ट्यूब लिकेजमुळे बंद करण्यात आला होता. चार दिवसानंतर या संचाची दुरुस्ती करुन तो कार्यान्वित करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री हा संच लाईटअप करुन वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे. यामुळे दीपनगर केंद्राने राज्याला सोमवारी 900 मेगावॅट विजेचा पुरवठा केला.

बॉयलर ट्यूब लिकेजमुळे संच बंद
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 500 मेगावॅटचा संच क्रमांक चारचे बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद झाला होता. गेल्या तीन महिन्यांत तब्बल सहावेळा हा संच बंद झाला आहे. यामुळे दीपनगरच्या वीज निर्मितीमध्ये ऐन उन्हाळ्यात मागणीच्या काळात घट झाली होती. दीपनगरातून केवळ 50 टक्के पीएलएफ गाठून विजेची निर्मिती केली जात होती. घसरलेल्या वीज निर्मितीमुळे राज्यातील पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती होती मात्र सोमवारी हा संच कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे राज्याला दीपनगर केंद्रातून 900 मेगावॅट विजेचा पुरवठा केला जात आहे. तुर्त तरी राज्यात कोठेही भारनियमन नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.



कोळशाचा मुबलक साठा
दीपनगर केंद्रातील संच चारच्या बॉयलर ट्यूब लिकेजमुळे संच बंद ठेवण्यात आला होता. हा संच कार्यान्वित करण्यात आला आहे. सध्या तिन्ही संचांतून निर्मिती होत आहे. दीपनगरातील कोळसा पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही. केंद्राकडे कोळशाचा साठा उपलब्ध असून दररोज रेल्वे वॅगन्सव्दारे कोळसा मिळत असल्याने तिन्ही संचांतून विजेची निर्मिती होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !