मुक्ताईनगर तालुक्यात उष्माघाताने शंभर मेंढ्या दगावल्या
आमदार चंद्रकांत पाटील यांची अधिकार्यांसमवेत भेट : भरपाईची मागणी
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा शिवारात मेंढपाळ बांधवाकडील सुमारे शंभरावर मेंढ्या उष्माघाताने दगावल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेने मेंढपाळ बांधवांवर मोठे संकट कोसळले असून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी मेंढपाळ बांधवांनी केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात तापमानाचा पारा 46 अंशावर गेल्यानंतर जनजीवन प्रभावीत झाले असताना दुसरीकडे मुक्या जनावरांनाही उष्माघाताचा फटका बसल्याचे समोर आले आहे.
उष्माघाताने ओढवला मृत्यू
थेरोळा शिवारातील गट नंबर 143/2 मधील भागवत राठोड यांच्या शेतात मेंढपाळ नामदेव चोपडे, भारत मदने, भोजू मदने, ज्ञानेश्वर मदने यांच्याकडील शंभरावर मेंढ्या चराईसाठी आणल्या होत्या मात्र तापमानाचा फटका या मुक्या जनावरांचा बसल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना व्हिडिओ कॉलद्वारे माहिती दिली. हसीलदार, पशू वैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठीदेखील उपस्थित होते. पशूवैद्यकीय अधिकार्यांनी जागेवर मेंढ्याचे शवविच्छेदन केले.


यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार पाटील यांच्या समवेत अशोक कांडेलकर, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, विभाग प्रमुख विनोद पाटील, पंकज पांडव, रणजीत गोयनका, सतीष नागरे, विनोद चौधरी, दीपक वाघ, दिलीप भोलाणकर, अविनाश वाढे, पंकज धाबे, राहुल खिरळकर, पांडुरंग तांबे, योगेश मूलक, गणेश सोनवणे, विष्णू पाटील, शेख फारुख, जावेद खान परिसरातील शेतकरी उपस्थित होते.