न्हावी शेत शिवारातून मोटरसायकल लांबवली
यावल : यावल तालुक्यातील न्हावी गावातील शेत-शिवारात शेत विहिरीजवळ लावलेली मोटरसायकल चोरी झाली. फैजपूर पोलीस ठाण्यात रविवारी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
न्हावी, ता.यावल या गावातील शेत शिवारात शेत गट क्रमांक 304 आहे. या शेतातील विहिरीजवळ हेमकांत पांडुरंग वाघुळदे (महादेव वाडा, न्हावी) यांनी आपली मोटर सायकल (क्रमांक एम. एच. 19 डी.सी. 3090) ही लावली होती. अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकल चोरी केली. सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र महाजन करीत आहे.
