भुसावळातून लांबवल्या आठ दुचाकी : मुक्ताईनगरचे तीन अल्पवयीन चोरटे ताब्यात


Eight bikes stolen from Bhusawal : Three juvenile thieves of Muktainagar arrested भुसावळ  : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मुक्ताईनगरच्या तीन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून शहरातील विविध भागातून लांबवलेल्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, संशयीतांनी घरच्यांना कामाला लागल्याची थाप मारून चोरीचे उद्योग सुरू केल्याचे समोर आले आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
शहरातील न्यु. एरिया वॉर्डात अल्पवयीन चोरटे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर 22 मे रोजी सापळा रचण्यात आला व चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, विजय नेरकर, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी आदींनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !