भुसावळात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी : परस्परविरोधी गुन्हे


Clash between two groups over petty dispute in Bhusawal : conflicting crimes भुसावळ : खड्डा खोदल्याच्या किरकोळ वादातून व दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या वादातून शहरातील जुना सातारा भागातील कोळी वाड्यात दोन गटात रविवारी दुपारी एक वाजता तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.

तरुणास मारहाण : चौघांविरोधात गुन्हा
खड्डा खोदल्याच्या वादातून शहरातील 32 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना जुना सातारा भागातील कोळीवाड्यात रविवार, 26 रोजी दुपारी एक वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नरेश रमेश सोनवणे (जुना सातारा, कोळी वाडा, भुसावळ) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवार, 26 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रस्त्यावर खड्डा खोदल्याच्या वादातून संशयीतांनी वाद घातला व सतीश पाटील याने लोखंडी कड्याने मारहाण केली तर अन्य संशयीतांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत आमच्या नांदी लागल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी संशयीत सतीश गुलाब पाटील, मनोज गुलाब पाटील, गुलाब पाटील व कविश मनोज पाटील (सर्व रा.कोळीवाडा, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण : तिघांविरोधात गुन्हा
दुसर्‍या गटातर्फे सतीश गुलाबराव पाटील (41, कोळीवाडा, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दारू पिण्यास पैसे मागितल्यानंतर फिर्यादीने ते न दिल्याच्या रागातून आरोपींनी घरात घुसून मारहाण केली. याप्रकरणी संशयीत नरेश रमेश सोनवणे, नरेशची आई व पत्नी (सर्व रा.कोळीवाडा, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी नरेशने दारूसाठी पैसे मागितले मात्र न दिल्याच्या रागातून आरोपींनी घरात प्रवेश करीत तक्रारदाराला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच आरोपी नरेशने लाकडी दरवाजा उचलून सतीश पाटील यांच्या पायावर मारल्याने दुखापत झाली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील व एएसआय इक्बाल सैय्यद करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !