मुक्ताईनगरात दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली


One lakh cash was stolen from the trunk of a two-wheeler in Muktainagar मुक्ताईनगर : दुचाकीच्या डिक्कीचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाखांची रोकड लांबवल्याची घटना मंगळवार, 28 रोजी दुपारी पावणेचार वाजता शहरात घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात दोन चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
पांडुरंग वेडू चौधरी (65, मुक्ताईनगर) या शेतकर्‍याच्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता शहरातील गणेश इलेक्ट्रीकल समोर त्यांनी दुचाकी (एम.एच.19 डी.वाय.5964) लावली असता चोरट्यांनी संधी साधून दुचाकीच्या डिक्कीचे कुलूप तोडले व डिक्कीतील एक लाखांची रोकड, पासबुक व चेकबुक लांबवले. काही वेळेनंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. 30 ते 35 वयोगटातील चोरट्यांनी अंगात चौकडीचा शर्ट तसेच दुसर्‍या गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चव्हाण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !