मुक्ताईनगरातील पूर्णा नदी काठावर गाळ वाहून नेणार्‍या डंपरने एकाला चिरडले


One was crushed by a dumper carrying silt on the bank of river Purna in Muktainagar मुक्ताईनगर : पूर्णा नदीच्या पात्रातून गाळ वाहून नेणार्‍या अवजड डंपरने 43 वर्षीय इसमाला चिरडल्याची घटना बुधवार, 29 मे रोजी दुपारी घडली. संदीप कैलास जोंधळे (43, निमगाव जाळी, ता.संगमनेर) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरालगत असलेल्या पूर्णा नदी पात्रातून तहसील कार्यालयाची कोणतीही परवानगी नसताना क्षमतेपेक्षा अधिक वजनाचा गाळ वाहून नेला जात आहे मात्र पोलीस व महसूल तसेच आरटीओ प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे.

डंपर चालकाविरोधात गुन्हा
पोकलॅण्ड ऑपरेटर अर्जुन लालसिंग वासकले (28, जास्वंदी, ता.बर्‍हाणपूर) यांच्या फिर्यादीनुसार बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पूर्णा नदीच्याकाठी संदीप कैलास जोंधळे (43) हा गाळ वाहून नेणार्‍या वाहनांची नोंद करीत असताना डंपर (एम.एच.19 सी.वाय.3569) ची धडक बसल्याने संदीपचा जागीच मृत्यू झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !