रावेर तालुक्यात वादळाच्या तडाख्याने केळीचे 37 कोटीचे नुकसान


रावेर : रावेर तालुक्यात रविवार, 26 रोजी सायंकाळी झालेल्या वादळामुळे 37 गाव शिवारातील एक हजार 123 शेतकर्‍यांच्या 939.75 हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे सुमारे 37 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

केळी उत्पादक पुन्हा संकटात
रावेर तालुक्यातील कुंभारखेडा, सावखेडा खु.॥, सावखेडा बु.॥, रोझोदा, कोचुर बु.॥, कोचूर खु.॥, बोरखेडासीम, लोहारा, खिरोदा प्र.यावल, कळमोदे, जानोरी, गाते, वाघोदा बु.॥, सुनोदा, उदळी बु.॥, लुमखेडा, वाघोदा बु.॥, सावदा, गहूखेडा, रणगाव, रायपूर, सुदगाव, उदळी खु.॥, तासखेडा, चुनवाडे, मांगी, गुलाबवाडी, अभोडा बु.॥, अभोडा, जीन्सी, लालमाती, केर्‍हाळे खु.॥, केर्‍हाळे बु.॥, मंगरूळ, मस्कावद खु.॥, मस्कावद बु.॥, मस्कावद सीम या 37 गावातील एक हजार 123 शेतकर्‍यांचे 939.75 हेक्टरवरील केळी पिकाचे सुमारे 37 कोटी 59 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !