भुसावळात एस.टी.प्रशासनाने बदलला बसेसचा मार्ग


भुसावळ  : जामनेर रोडवरील वाल्मीक नगरातील भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची निर्घूण हत्या झाल्यानंतर शहरात वाढलेले तणावाचे वातावरण पाहता भुसावळ एस.टी.प्रशासनाने पांडुरंग टॉकीजमार्गे जळगावसह यावलकडे जाणार्‍या सुमारे 210 बसेसचा मार्ग बदलला. बसस्थानकातून बसेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडून महामार्गावरून पुढील इच्छीत स्थळी रवाना झाल्या.

शहरातील वातावरणामुळे प्रवाशांची संख्या रोडावली
भुसावळातील माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या निर्घूण खुनानंतर शहरातील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे तर व्यापार्‍यांनीदेखील दिवसभर स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. बारसे यांचे निवास्थान जामनेर रोडवरील वाल्मीक नगर असल्याने या भागात वाढलेली गर्दी पाहता एस.टी.प्रशासनाने गुरुवारी सकाळी नऊ वाजेपासूनच या मार्गावरील बसची वाहतूक बंद ठेवली. भुसावळ बसस्थानकातून यावल, रावेर, जळगाव, जामनेर मार्गावरील बसेस या पांडुरंग टॉकीजकडून पंधरा बंगला, महामार्गावरून ग्रामीण रुग्णालयावरून पुढे जात जळगावरोडवर आल्या व तेथून जळगाव तर यावलसाठी पुन्हा गांधी पुतळ्यामार्गे मार्गस्थ झाल्या. बसमध्येदेखील अल्प प्रवाशांची गर्दी दिसून आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !