किनगावातील आत्माराम नगरात धाडसी घरफोडी : सव्वा लाखांचा ऐवज लंपास


Daring house burglary in Atmaram Nagar of Kingaon यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथील आत्माराम नगरात धाडसी घरफोडी झाल्याने गावात खळबळ उडाली. अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख 20 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीची घटना गुरुवार, 30 मे रोजी सकाळी निदर्शनास आली. यावल पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घरफोडीने किनगावात उडाली खळबळ
किनगाव येथील आत्माराम नगरात रफिक वजीर तडवी हे राहतात. ते सोमवार, 27 मे रोजी आपल्या घराला कुलूप लावून मुंबई येथे गेले होते व गुरुवारी सकाळी सात वाजता घरी परतले असता घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी घरातील साहित्याची फेकाफेक करीत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख वीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लांबवला. घटनास्थळी यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार नरेंद्र बागुले, वासुदेव मराठे, केदारे आदी दाखल झाले.

जळगाव येथून ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. यावल पोलीस ठाण्यात रफिक वजीर तडवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूघ्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार नरेंद्र बागुले, वासुदेव मराठे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !