साकळी गावात घरफोडी : 37 हजारांचा मुद्देमाल लांबवला
यावल : यावल तालुक्यातील साकळी गावात लोधी वाड्यातील बंद घरात घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाज्याचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 37 हजारांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात संशयतांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
37 हजारांचा ऐवज लांबवला
साकळी येथील लोधी वाड्यामध्ये कोकिळाबाई काशीनाथ पाटील (62) ही वृद्धा राहते. त्यांच्या बंद घराच्या दरवाज्याचा कडी-कोंडा अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला आणि कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण 37 हजारांचा मुद्देमाल लांबवला. चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात कोकिळाबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.
