भुसावळातील प्रमोद सावकारे यांना धमकी : नेपानगरातून संशयीत ताब्यात


Threat to Pramod Savkare from Bhusawal : Suspect arrested from Nepanagar भुसावळ  : भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांना एका संशयीताने मोबाईलवरून तब्बल आठ ते नऊ कॉल करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. ही घटना शनिवार, 1 जून रोजी दुपारी घडली होती. या घटनेनंतर भुसावळातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी संशयीताविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीताचा कसून शोध सुरू करण्यात आल्यानंतर रविवारी त्यास मध्यप्रदेशातील नेपानगर भागातून पथकाने ताब्यात घेतले. संशयीताची रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून चौकशी सुरू होती.

आठ वेळा कॉल करीत धमकी
शनिवार, 1 जून रोजी सकाळी कॉटन सेलचे संचालक प्रमोद सावकारे हे वाल्मीक नगरातील बारसे कुटुंबीयांकडे सांत्वनासाठी गेले होते. तेथून घरी आल्यानंतर दुपारी 1.38 वाजता त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलरने ‘तुम्ही या प्रकरणात सहभागी होऊ नका अन्यथा जीवे ठार मारू’ अशी धमकी अनोळखी कॉलरने दिली होती व यानंतर सातत्याने 8 ते 9 वेळा पुन्हा कॉल आले त्यामुळे प्रमोद सावकारे यांनी सायंकाळी बाजारपेठ पोलिसात अनोळखी संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

नेपानगरातून संशयीत ताब्यात
शहरातील दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धमकीचा प्रकार गांभीर्याने घेत तांत्रिक विश्लेषणावरून संशयीत रवी आर.के. यास नेपानगर (मध्यप्रदेश) येथून रविवारी दुपारी ताब्यात घेतले. सायंकाळी त्याची पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांनी चौकशी केली मात्र त्याचा तपशील कळू शकला नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !