जनता एक्सप्रेसमधील प्रवाशांचे मोबाईसह रोकड लूटणारी टोळी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


The mob that looted cash from Janata Express passengers with Mobai in MIDC police’s net जळगाव : जनता एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍या परप्रांतीय प्रवाशांचे तीन मोबाईल व रोख रक्कम मिळून 60 हजारांचा मुद्देमाल लांबवणार्‍या चौघांच्या टोळीला जळगाव एमआयडीसी पोलिसांनी रविवारी मेहरूण परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीसात गुन्हा दाखल आहे. अटकेतील संशयीत आरोपींना पुढील कारवाईसाठी चाळीसगाव लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

असे आहे लूट प्रकरण
रोहित विमल यादव (23, रा.बिहार) हे दोन मित्रांसोबत रविवार, 2 जून रोजी मुंबईहून पटणा येथे जण्यासाठी जनता एक्सप्रेसने निघाले होते. सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी तिघे जण रेल्वेत झोपलेले असतांना तीन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 60 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलिात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारे चारही चोरटे हे जळगाव शहरातील असल्याचे निष्पन्न केले.

आरोपींना जळगावातून अटक
चाळीसगाव रेल्वे पोलिसांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधून माहिती दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना चोरट्यांची माहिती मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. रविवारी गुन्हे शोध पथकाने दुपारी तीन वाजता कारवाई करत संशयित आरोपी गुरूजितसिंग सुजानसिंग बावरी (25, रा.तांबापुरा), शेख अजर शेख मजर (28, रा.सुप्ररम कॉलनी), सुधीर सुभाष भोई (19) आणि अल्ताफ फिरोज खान (20, दोन्ही रा.रामेश्वर कॉलनी) यांना मेहरूण परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले. पुढील कारवाईसाठी अटकेतील संशयितांना चाळीसगाव लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !