भुसावळात स्वस्त धान्याचा काळाबाजार : दोघांविरोधात गुन्हा

सहा लाख 43 हजारांच्या धान्याची अफरातफर : तपासणीत गैरव्यवहार उघड


Black market of cheap grain in Bhusawal : Crime against two भुसावळ : गोरगरीबांच्या घशातील स्वस्त धान्यासह शासनाकडून आलेला आनंदाचा शिधा रेशन दुकानदाराने दोन दुकानांच्या माध्यमातून काळ्या बाजारात विक्री केल्याचा संतापजनक प्रकार शहरासह तालुक्यात पुरवठा विभागाच्या तपासणीत उघड झाला. याप्रकरणी बेलव्हाण, ता.भुसावळ येथील रेशन दुकानदार सुरेखा नारायण वाणी व देवेंद्र नारायण वाणी (वाणी गल्ली, वांजोळा रोड, भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने धान्य दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
पुरवठा अधिकारी अतुल वाकोजी नागरगोजे यांच्या तक्रारीनुसार बेलव्हाय, ता.भुसावळ येथील येथील सुरेखा वाणी स्वस्त धान्य दुकानासह भुसावळातील रानातल्या महादेव मंदिराजवळील एन.एम.बर्‍हाटे स्वस्त धान्य दुकानातून 8 ते 24 एप्रिल 2024 दरम्यान एक लाख 85 हजार 840 रुपये किंमतीचा 92.92 क्विंटल गहू, चार लाख 10 हजार 850 रुपये किंमतीचा 136.95 क्विंटल तांदुळ, 42 हजार 714 रुपये किंमतीचा 189 नग आनंदाचा शिधा तसेच तीन हजार नऊशे रुपये किंमतीच्या 34 साड्या मिळून सहा लाख 43 हजार 304 रुपयांचे वस्तू काळ्या बाजारात विक्री करण्यात आल्या.

संबंधिताकडून या संदर्भात समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात न आल्याने नागरगोजे यांनी सुरेखा वाणी व देवेंद्र वाणी यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र गरबड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !