जळगावच्या मनप्पुरम बँकेला नकली सोन्याच्या माध्यमातून गंडा : टोळी जाळ्यात


जळगाव : नकली दागिण्यांना सोन्याचा मुलामा चढवून त्याद्वारे कर्ज लाटणार्‍या टोळीला जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील संशयीतांमध्ये जळगावसह आग्रा येथील आरोपींचा समावेश असून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
जळगावातील मनप्पुरम फायनान्स लिमीटेड या खाजगी संस्थेत हर्षल रविंद्र पेटकर (23) हे व्यवस्थापक असून संस्थेचे नवीपेठ परिसरातील कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय आहे. या संस्थेत 1 जून रोजी सायंकाळी 4.35 च्या सुमारास आलेले जोराराम रानुराम बिस्नोई, (50) खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (31) यांनी बनावट, खोटे सोन्याचा मुलामा चढवलेले दागिने खरे आहेत म्हणुन गहाण ठेवुन त्याबदल्यात कर्ज रुपी दोन लाख 66 हजार रुपये स्वतःच्या फायद्याकरीता लबाडीने मिळविले होते. 5 जून रोजी तशाच प्रकारचे दागिने घेऊन दोन इसम आल्याने ते पाहून व्यवस्थापक चक्रावले. तपासणी केली असता ते सोने बनावट असल्याचे त्यांचा लक्षात आले, त्यामुळे त्यांनी अगोदर सोने ठेवलेल्या दोघांना ज्यादा 40 हजार देण्याचे आमीष देत बोलावून घेतले.



पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
बुधवार, 5 जून रोजी दुपारी 11 वाजेच्या सुमारास जोराराम रानुराम बिस्नोई (50), खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (31) हे वाढीव रक्कम घेण्यासाठी आले असता बँकेचे सहकारी आणि व्यवस्थापक यांनी दोघांना कार्यालयात थांबवले आणि शहर पोलिसांना बोलावले. शहर पोलिसांनी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता एका लॉजमध्ये थांबलेले सतीषचंद शोवरन सिंग (32, आग्रा, उत्तरप्रदेश) आणि संतोष मुन्नालाल कुशवाह (35, आग्रा, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
बँकेचे व्यवस्थापक हर्षल पेटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिसात आरोपी जोराराम रानुराम बिस्नोई (50), अकबर अली महेमूद अली (नशिराबाद बस स्टॅन्डजवळ, जळगाव), खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (31, बालाजीपेठ, बालाजी मंदिरासमोर, शनिपेठ, जळगाव), सतीषचंद शोवरन सिंग (32, आग्रा, उत्तरप्रदेश), संतोष मुन्नालाल कुशवाह (35, घर नं. 46/1019, गल्ली नं.17, किशोरपुरा, बोथला रोड, आग्रा, उत्तरप्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रवींद्र सोनार करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !