वरणगावात पूर्व वैमनस्यातून खून : दोन आरोपींना अटक


Murder due to prior enmity in Warangaon : Two accused arrested भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे जुन्या वादातून 28 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवार, 4 जून रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत सय्यद आरीफ अली सय्यद समद अली (28, वरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाला होता. वरणगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत दोन संशयीतांना अटक केली होती. संशयीतांना गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

जुन्या वादातून तरुणाचा खून
आरीफअली समदअली सय्यद या तरुणाचा डिसेंबरमध्येही संशयीतांसोबत वाद झाला होता व त्यानंतर पोलिसात तक्रारही करण्यात आली होती व त्यानंतर मंगळवार, 4 रोजी दुचाकी लावण्यावरून पुन्हा वाद उफाळला. संशयीतांनी धारदार चाकूचे वार केल्याने सय्यद आरीफ अली सय्यद समद अली (28, वरणगाव) या तरुणाचा मृत्यू ओढवला तर अन्य तिघे जखमी झाले होते. याप्रकरणी पाच संशयीतांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीत राहिल सईद सय्यद (पहेलवान) व रेहान खालीद सय्यद (दोन्ही रा.वरणगाव) यांना अटक करण्यात आली व बुधवारी त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता 10 जूनपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयीतांतर्फे अ‍ॅड.गजू पाटील यांनी काम पाहिले. तपास सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !