भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांड : विष्णू पथरोडला मध्यप्रदेशात ठोकल्या बेड्या

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : अटकेतील आरोपींची संख्या झाली पाच


भुसावळ :  भुसावळातील दुहेरी हत्याकांड प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील छनेरा गावातून विष्णू पथरोड या संशयीताला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळातील दुहेरी हत्याकांडप्रकरणी दहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयीत विष्णू पथरोडबाबत जळगाव गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर पथकाने मध्यप्रदेशातील छनेरा येथून विष्णू पथरोड यास अटक केली. जळगाव गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अटकेतील चार आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
दरम्यान, दुहेरी हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही संशयीतांची कोठडीची मुदत गुरुवार, 6 जून रोजी संपल्यानंतर त्यांना व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यनंतर संशयीताना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

व्हीसीद्वारे झाला युक्तीवाद
भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना बुधवार, 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता शहरातील जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरासमोर घडली होती. याप्रकरणात यीताला शनिवारी दुपारी अटक करण्यात आली. दुहेरी हत्याकांडातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे. रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, विनोद चावरिया व करण पथरोड तसेच आरोपींना शस्त्र लपवण्यास मदत करणार्‍या किरण कोळी (35, अकलूद, ता.यावल) अटकेत आहे. संशयीतांना शुक्रवार, 31 मे रोजी भुसावळातील रेल्वे न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर गुरुवार, 6 जून रोजी व्हीसीद्वारे हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर निरीक्षक संदीप रणदिवे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !