वादळी वार्यामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना भरपाई द्यावी
भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे : केळी पाने फाटल्यानेही द्यावी भरपाई
यावल : वादळी वार्यामुळे तसेच हवामानावर आधारीत केळी पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई केळी फळ पीक विम्याच्या माध्यमातून शेतकर्यांना लवकर देण्यात यावी, अशी मागणी भाजपा जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार, वादळात केळीची पाने फाटल्यानेदेखील केळीची प्रकाश संश्लेषण क्रिया योग्य होत नसल्याने उत्पादनात घट येत असल्याने ही बाब नैसर्गिक आपत्तीत धरून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अपलोड माहिती ग्राह्य धरण्याची अपेक्षा
वादळी वारे तसेच गारपिट मुळे केळी उत्पादक शेतकर्यांचे नुकसान होत असते. नुकसानग्रस्त शेतकर्यांना 72 तासांच्या आत विमा कंपनीला नुकसानी बाबत तक्रार करणे क्रमप्राप्त असते, त्यानंतर जर शेतकरी तक्रार देत असतील तर ती तक्रार ग्राह्य धरण्यात येत नाही. शेतकर्याची नुकसानीची तक्रार सूचना दिल्यानंतर विमा कंपनीला सुद्धा 5 ते 7 दिवसाची मुदत द्यावी. त्या मुदतीत विमा कंपनीने पंचनामे पूर्ण करावेत. बर्याचदा विमा कंपनी 20 ते 25 दिवस झाल्यावर सुद्धा पंचनामे पूर्ण करत नाही. जास्त दिवस झाल्यावर व पुढील हंगामासाठी शेतकर्याला नुकसानग्रस्त पीक शेतात ठेवता येत नाही, त्यामुळे नुकसानीचे योग्य आकलन होत नाही त्यामुळे शेतकर्यांनी नुकसानी ाबत जी माहिती अपलोड केलेली आहे ती माहिती ग्राह्य धरण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

केळी पाने फाटल्यानेही नुकसान
अनेक वेळा वादळी वार्यामुळे किंवा गारपिटीमुळे केळी पीक पूर्णतः पडत नाही पण केळीचे पाने पूर्ण फाटून जातात. केळी पिकाची मुख्य अन्न प्रक्रिया होण्यासाठी केळीचे पाने चांगली असणे आवश्यक असते. वादळी वार्यामुळे पूर्णतः केळीचे पाने फाटलेली असतील तरी नुकसानग्रस्त ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी सुद्धा त्यांनी जावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हवामानावर आधारित केळी फळ पिक विमा योजना 2023-24 मधील विमा प्रस्ताव नाकारण्यात आलेल्या 10 हजार 619 शेतकर्यांपैकी सहा हजार 886 विमा प्रस्ताव ग्राह्य धरून नुकसान भरपाईबाबत आदेश दिले होते. ही परिस्थिती पाघता सर्वच नुकसानग्रस्त शेतकर्यांना तत्काळ भरपाई देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे अमोल जावळे यांनी केली आहे.




