भुसावळ शहरातील स्मशानभूमीतून दुचाकी लांबवली


भुसावळ  : शहरात सातत्याने होणार्‍या दुचाकी चोरीमुळे वाहनधारक त्रस्त असतानाच आता चोरट्यांनी स्मशानभूमीतूनही दुचाकी लांबवण्याचे धाडस केले आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

देविदास हरी येवलेकर (64, शांती नगर, सोपान कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, तापी पुलाजवळील स्मशान घाटात ते अंत्ययात्रेला आल्यानंतर त्यांनी दुचाकी (एम.एच.-7897) ही लावली असता चोरट्यांनी दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. हा प्रकार बुधवार, 5 जून रोजी सकाळी 10 ते 11 दरम्यान घडला. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकीचा तपास न लागल्याने त्यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पालवे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !