रावेर तालुका हादरला : पती-पत्नीने वेगवेगळ्या ठिकाणी कवटाळले मृत्यूला


रावेर : रावेर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी पती व पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत रावेर व निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पती-पत्नीने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

निंभोरा पोलिसात नोंद
खिरोदा येथे शेत-शिवरातील घटनास्थळी भुसावळ विभागाचे डीवायएसपी कृष्णकांत पिंगळे यांनी भेट दिली आहे. मध्यप्रदेशातील बेलखेडा येथील सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण (44) याने निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीत भोकर नदी जवळ एका बाभळीच्या झाडाला शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह रविवारी आढळून आला. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पत्नीचा मृतदेह आढळला
खिरोदा प्र. रावेर गावाजवळील रसलपूर आभोडा रोडवरील कमलेश नत्थु महाजन यांच्या शेतात बेलखेडा येथील प्यारीबाई सुकलाल चव्हाण ( 42) या महिलेचा मृतदेह सोमवारी आढळून आला. तिनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याबाबत शेतमालक कमलेश महाजन यांनी खबर अकस्मात मृत्यूची नोंद करणयात आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, तुषार पाटील , सतीश सानप, सचिन घुगे, राहुल परदेशी यांनी धाव घेतली. दोघेही पती-पत्नीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.वैभव गिरी यांनी केले. दोघांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी गळफास घेतल्याने झाल्याचे त्यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !